मुंबई, दि.२६ : मंगेश म्हात्रे
राज्य सरकार पुढील महिन्यात महाराष्ट्रातील एसटी बस डेपो दीर्घकालीन ९८ वर्षांच्या लीजवर वर्षे देण्यासाठी टेंडर काढणार आहे. या डेपोचे बस पोर्टमध्ये रूपांतर होणार असून, गुजरातच्या धर्तीवर हा विकास होईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

ते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे नरेडको महाराष्ट्र आयोजित ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ च्या उद्घाटनावेळी बोलत होते.
सरनाईक म्हणाले, “एमएसआरटीसीकडे मुंबईसह राज्यभरात तब्बल १३ हजार एकरांहून अधिक मौल्यवान जागा आहे. पूर्वी ३० वर्षांसाठी दिले जाणारे डेपो आता ९८ वर्षांच्या लीजवर देण्यात येणार असून, हे डेपो आधुनिक बस पोर्टमध्ये विकसित होतील.”
यावेळी त्यांनी पॉड टॅक्सी प्रकल्पाचाही उल्लेख केला. “बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये लवकरच पॉड टॅक्सी सुरू होईल. पुढे याचा विस्तार मीरा-भाईंदर आणि ठाण्यात करण्यात येईल,” असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून अभिनेते व रग्बी इंडिया अध्यक्ष राहुल बोस उपस्थित होते. त्यांनी विकासकांना आवाहन केले की, “गरजूंसाठी कमी किमतीची घरे आणि सर्वांसाठी सामुदायिक ठिकाणे निर्माण व्हावीत.”
नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी रिअल इस्टेट क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. नरेडको इंडियाचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी ‘हाऊसिंग फॉर ऑल’ या संकल्पनेला गती देण्यासाठी बस डेपो विकास योजनेत सहभागी व्हावे असे विकासकांना आवाहन केले.
नरेडको इंडियाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी “रिअल इस्टेट क्षेत्राचा प्रत्यक्ष वाढीचा दर १५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल” असा अंदाज व्यक्त केला. पुढील चार वर्षांत ३०० किमी मेट्रो पूर्ण होणे, नव्या विमानतळांची उभारणी, रेल्वे-मेट्रो कनेक्टिव्हिटी व बंदर विकासामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला गती मिळेल, असे ते म्हणाल




















