Homeताज्या बातम्याकंकालेश्वर मंदिर बीड आणि औंधचे संग्रहालय....

कंकालेश्वर मंदिर बीड आणि औंधचे संग्रहालय….

या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १ : अनंता मोटे

बीड येथील यादवकालीन कंकालेश्वर मंदिर आणि सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय हे महाराष्ट्राचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा असून त्यांचे संवर्धन हेरिटेज पद्धतीने, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीत या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन-दुरुस्तीच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पुण्याचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांनीही सहभाग घेतला.

पवार म्हणाले, “बाराव्या शतकातील स्थापत्य वैशिष्ट्यांनी नटलेले कंकालेश्वर मंदिर हे ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्या जतन-दुरुस्तीकरिता शासनाने ९ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सरोवरातील गाळ काढणे, पदपथ-दुरुस्ती, जोत्यांचे मजबुतीकरण, गळती प्रतिबंधक योजना तसेच बाग-बगीचा विकासाची कामे हाती घेतली जातील ते पुढे म्हणाले की, “या वारशाचे संवर्धन करताना कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही. परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. कंकालेश्वर मंदिर व औंधचे संग्रहालय हे राज्याच्या सांस्कृतिक वारशातील दैदिप्यमान स्मारके असून त्यांच्या जतनासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!