Homeताज्या बातम्यापैठण तालुक्यातील दावरवाडीला नवी ओळख... 

पैठण तालुक्यातील दावरवाडीला नवी ओळख… 

‘विरभद्र नगर रो हाऊस’ प्रकल्पाचा शुभारंभ सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते संपन्न…

भुमिपुत्र इंजि. चंद्रकांत खांडे यांचा गावातच उद्योग उभारणीचा प्रेरणादायी उपक्रम

पैठण, दि. १९ 🙁 विनोद एडके)

पैठण तालुक्यातील दावरवाडी गावाला नवी ओळख देणारा ‘विरभद्र नगर रो हाऊस’ हा आधुनिक गृहप्रकल्प दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर रविवारी (दि. १९) रोजी संपन्न झाला.

या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि शुभारंभ छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे व पाचोडचे सरपंच शिवराज पाटील भुमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सरपंच शिवराज भुमरे म्हणाले,

“गावातील एखादा युवक यशस्वी झाला की तो शहराची वाट धरतो, पण चंद्रकांत खांडे यांनी त्याला अपवाद ठरवत आपल्या गावातच उद्योग उभारण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. ‘विरभद्र नगर रो हाऊस’ आणि ‘खांडे ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून त्यांनी गावातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.”

या कार्यक्रमास सरपंच ऍड. डी. डी. जाधव, उपसरपंच प्रशांत देशमुख, जि.प.मा.सदस्य कमलाकर एडके, मा. सरपंच शाम तांगडे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण खांडे, राजेंद्र नंन्नवरे, नानेगावचे मा. सरपंच गणपतराव माने, केदार शिंदे, कुतुबखेडचे मा.सरपंच विठ्ठल पठाडे, आबासाहेब गोजरे, मुख्याध्यापक अनिल इंगळे, सिद्धार्थ इंगळे, बद्रीआण्णा थोटे, प्रकाश देशमुख, विष्णु सोरमारे, वैष्णव, विलास जाधव, कैलास खुटेकर, बाबासाहेब खांडे, धनंजय एडके, तसेच पत्रकार अंबादास एडके आदींसह पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी गुलाबराव खांडे सोशल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने गावात केलेल्या विविध विकासकामांचे परिपत्रक सरपंच शिवराज भुमरे यांना प्रदान करण्यात आले.

या संस्थेच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की,

“गावाच्या प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळेच ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहू शकते.”

या भूमिपूजन सोहळ्यामुळे दावरवाडी गावाला नवी ओळख प्राप्त झाली असून, ‘विरभद्र नगर रो हाऊस’ प्रकल्प ग्रामीण भागातही आधुनिक बांधकामाची झेप दाखवणारा ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!