Homeताज्या बातम्यापोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन.. १९१ पोलीस शूरवीरांना वाहिली श्रद्धांजली.....

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन.. १९१ पोलीस शूरवीरांना वाहिली श्रद्धांजली…..

मुंबई, दि. २१ : अजय मगरे

नायगाव पोलीस मुख्यालय येथे आज आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून वीर शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे वाणिज्यदूत, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशातून देशभरातील गेल्या वर्षभरात हौतात्म्य प्राप्त झालेल्या ३४ पोलीस अधिकारी आणि १५७ पोलीस अंमलदार, असे एकूण १९१ शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटले की, “हे पोलीस हुतात्मे देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे खरे राष्ट्रवीर आहेत.”

कार्यक्रमादरम्यान शहीद पोलिसांची नावे वाचून दाखविण्यात आली. त्यानंतर पोलीस बँड पथकाने सलामी शस्त्र धून सादर केली. गणवेशधारी जवानांनी ताठ उभे राहून सलामी दिली तर श्रद्धांजली म्हणून तीन बंदुकींच्या फैरी झाडण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित देश-विदेशातील पाहुण्यांची, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आणि शहीदांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!