“शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही” – उद्धव ठाकरे
पैठण, दि.५.( अभिजीत सोनवणे )
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी आज पैठण तालुक्यातील नांदर येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
या संवादादरम्यान त्यांनी दगाबाज राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसानभरपाई जाहीर केली असली तरी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचलेले नाहीत. शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”
उद्धवसाहेबांनी शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष नुकसानभरपाईची वास्तविक माहिती घेतली आणि या कठीण काळात “शेतकरी बांधवांच्या मी नेहमीच पाठीशी आहे” असा ठाम विश्वास दिला.
कार्यक्रमास मिलिंद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, विनोदजी घोसाळकर, राजेंद्र राठोड, दत्तात्रय गोर्डे, मनोज पेरे, सोमनाथ जाधव, राजु शेठ परदेशी, शुभम पिवळ, बबन भावले, नकुल मुळे, सुरेश दुबाले, उपतालुकाप्रमुख किशोर वैद्य, डॉ. सुनिल शिंदे तसेच महिला आघाडीच्या राखीताई परदेशी आणि स्थानिक पदाधिकारी रविंद्रदादा काळे, ऊदयसेन काळे, मित्रवर्धन काळे, संजय सदावर्ते, परमेश्वर कपटी, ईश्वर कपटी, शुभम गायकवाड, सचिन ढमाळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नांदर व परिसरातील शेकडो शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
प्रतिनिधी. अभिजीत सोनवणे
—




















