Homeताज्या बातम्याएसआरए'च्या ऑनलाईन प्रणालीतून सुलभ प्रशासन - डॉ महेंद्र कल्याणकर

एसआरए’च्या ऑनलाईन प्रणालीतून सुलभ प्रशासन – डॉ महेंद्र कल्याणकर

एसआरए’च्या ऑनलाईन प्रणालीतून सुलभ प्रशासन – डॉ महेंद्र कल्याणकर

पिटा’च्या प्रतिनिधींसमवेत “धोरण, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम” परिसंवाद संपन्न

मुंबई, दि. २९ : मंगेश म्हात्रे

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), बृहन्मुंबई कार्यालय आणि प्रॅक्टिसिंग इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स अ‍ॅण्ड टाउन प्लॅनर्स असोसिएशन (पिटा) यांच्या संयुक्त विद्यमाने “धोरण, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि डिजिटल सेवांद्वारे सुलभ संवाद” या विषयावर परिसंवाद सत्र यशस्वीरीत्या पार पडले.

या सत्रात एसआरएच्या ऑनलाईन प्रणालींच्या माध्यमातून विविध परवानग्यांची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पिटा (आय) चे प्रतिनिधी आणि जवळपास १२५ वास्तुविशारद, अभियंते आणि नगररचनाकार उपस्थित होते.

परिसंवादादरम्यान प्राधिकरणाच्या डिजिटल उपक्रमांची, नव्या धोरणात्मक बदलांची आणि तांत्रिक उपायांची माहिती देण्यात आली. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज व मंजुरी प्रक्रियांचे सरलीकरण, प्रकल्प ट्रॅकिंग व देखरेखीसाठी नाविन्यपूर्ण साधनांचा वापर, तसेच १५ ते २० नवनवीन सुविधा याबाबतही विस्तृत माहिती सादर करण्यात आली.

पिटा प्रतिनिधींनी एसआरए’च्या सक्रिय आणि संवादात्मक कार्यपद्धतीचे कौतुक करत, भविष्यात समन्वय वाढविण्यासाठी रचनात्मक चर्चा केली. तंत्रज्ञानाधारित प्रशासनामुळे प्रकल्प वेळेत आणि परिणामकारकपणे पूर्ण करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या प्रसंगी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले,

“आमचे ध्येय हे पारदर्शक, कार्यक्षम आणि डिजिटल सशक्त असे वातावरण निर्माण करणे आहे. वास्तुविशारद, अभियंते आणि विकासक यांच्या सहकार्याने झोपडीधारकांना कमी वेळेत पुनर्वसन इमारतीत स्थलांतरित करता येईल.”

हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business) आणि डिजिटल गव्हर्नन्स परिवर्तनाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, एसआरए’च्या कार्यपद्धतीतील सतत सुधारणा आणि पारदर्शकतेकडे एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!