Homeताज्या बातम्यासंक्रमण शिबिरास शाहू नगरवासीयांचा ठाम नकार

संक्रमण शिबिरास शाहू नगरवासीयांचा ठाम नकार

धारावी पुनर्विकासावरून वातावरण तापले

मुंबई | मंगेश म्हात्रे

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर माहीम पूर्व येथील शाहू नगर वसाहतीतील रहिवाश्यांनी संक्रमण शिबिरात स्थलांतरास ठाम नकार दिला असून “हक्काचे घर मिळाल्याशिवाय इंचभरही हलणार नाही,” असा एकमुखी निर्धार व्यक्त केला आहे. या मुद्द्यावर शनिवारी सायंकाळी शाहू नगर येथे तातडीची बैठक घेण्यात आली.

शाहू नगर विकास समिती आणि डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. १३ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरावर चर्चा झाली होती. मात्र संक्रमण शिबिरात जाण्यास रहिवाशांनी स्पष्ट विरोध दर्शविल्याने हा मुद्दा अधिकच तापला आहे.

नगरसेविका हर्षलाताई मोरे यांनी सांगितले की, धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन अद्याप जाहीर झालेला नसताना रहिवाशांना कुठे घरे देणार याची स्पष्ट माहिती नाही. “अशा परिस्थितीत लोकांना स्थलांतरित करणे अन्यायकारक आहे. प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळेपर्यंत कोणालाही येथून हलू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक जोसेफ कोळी यांनीही संताप व्यक्त करत शाहू नगर ही धारावीतील सर्वांत चांगली वसाहत असल्याचे सांगितले. “डीआरपी आणि अदानी प्रकल्पामुळे कोळी समाजातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना हलविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

शाहू नगर भाडेकरू संघाचे माजी अध्यक्ष अरुण जाधव यांनी सांगितले की, “आम्ही आधीच एकदा स्थलांतरित आहोत. पुन्हा संक्रमण शिबिरात पाठविणे हा अन्याय आहे. पुनर्वसन शाहू नगरमध्येच झाले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी रहिवाशांना केले.

बैठकीत चार्ली ऍंथोनी यांनी एकजुटीचे आवाहन करत जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली. “एकजूट हीच आपली ताकद आहे,” असा संदेश त्यांनी दिला.

दरम्यान, शाहू नगर परिसरात अस्वस्थतेचे वातावरण असून आगामी काळात रहिवासी तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. “हक्कासाठी लढू, पण घर सोडणार नाही,” असा आवाज बैठकीत उमटला.

या बैठकीस माजी आमदार बाबुराव माने,दिपक खंदारे डीआरपी सेक्टर १ रहिवाशी कृती समितीचे निमंत्रक आशिष मोरे, विवेक कांबळे, राजेश शर्मा, पत्रकार परेश मोटे तसेच धारावी बचावचे नसरूल हक्क,उलेश गजाकोश,शाखा प्रमूख मुत्तू पट्टन तसेच शाहू नगरचे मकरंद काणे,संजय मानकर,शेखर तोडणकर,विशाल जामदार, व्हिक्टर सालढाणा,दीपक वाघमारे,हरीश लेखक,गजानन पेडणेकर,भूषण नागवेकर,जयेश सैद,सेलिस्टीन रॉड्रिग्स,कुंदन शेजवळ आदी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!