Homeताज्या बातम्यामहापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व भाष्यकार अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे यांनी केले.

डोंगरी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका बी विभागातील मुख्य मलनिस्सारण (बाबुलाल वर्कशॉप) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मंगळवारी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला. यावेळी ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
. सोनावणे पुढे म्हणाले की, समाजातील अनिष्ट प्रथा व रूढींना छेद देत महापुरुषांनी माणसाला माणसाशी जोडण्याचे कार्य केले. मात्र, आज महापुरुषांना जाती-धर्मांत विभागले जात असून त्यामुळे समाजात दुफळी निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कामगार हक्कांच्या संदर्भात त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या लढ्याचा उल्लेख करत, कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. तसेच डोंगरी परिसर हा महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याने पावन झालेला असून, क्रॉफर्ड मार्केट, टाइम्स ऑफ इंडिया इमारत तसेच व्हिक्टोरिया टर्मिनसच्या काही भागांच्या उभारणीत त्यांच्या कंपनीचे योगदान असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी आरक्षण, जनगणना, उपवर्गीकरण, महिला आरक्षण विधेयक, बोनस व अनुकंपा तत्त्व यांसारख्या विषयांवरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. छत्रपती शाहू महाराज यांनी २६ जुलै १९०२ रोजी करवीर संस्थानात ५० टक्के आरक्षण लागू करून बहुजन समाजाला मोठा आधार दिला, तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवला, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला उपमुख्य अभियंता विनायक गवस, सहाय्यक अभियंता श्रीमती प्रांजली नेमाडे, नरेश गुरव, सचिन भगत, दुय्यम अभियंता आकाश परब, कार्यकारी अभियंता सुरेश येमेकर, दुय्यम अभियंता सदानंद गुप्ता, आनंद पाटील, कनिष्ठ अभियंता रोशन ढोणे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष दादू पवार, उपाध्यक्ष मंगेश टोम्पे, सचिव विवेक पवार, खजिनदार लक्ष्मण धनावडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!