“पैठण तालुक्यातील पाचोडमधील कल्याणनगर येथील घटना”
पैठण, दि.१५. ( सिद्धार्थ मगरे )
पैठण तालुक्यातील पाचोड मधील कल्याणनगर भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून आकाश सोमनाथ शेळके (वय २५) रा.कल्याणनगर असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे
व्हिओ:
पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर भागामध्ये राहणारा आकाश सोमनाथ शेळके याचे आई-वडील मागील महिन्यामध्ये ऊसतोडी कामगार असल्याने बाहेरगावी गेलेले आहेत तर पत्नी ही मागील काही दिवसापासून माहेरी राहत असल्याने तो अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त होता, शुक्रवारी सायंकाळी आकाश याने उशिरा जेवण करून स्वतःच्या घरी झोपला असता शनिवारी लवकर त्याचे घर उघडले नसल्याने त्याच्या मावसबंधूने घर उघडून पाहिला असता, त्यास आकाश याने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले, यावेळी त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला असता असता, त्याच्या घरातील नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे तात्काळ 112 वर दिली असता बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून आकाश शेळके यास स्थानिक नागरिकाच्या मदतीने फासावरून खाली उतरून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी त्यास तपासून मृत्यू घोषित केले आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
सिद्धार्थ मगर पाचोड




















