Homeताज्या बातम्याकोपरगांव तालुका काँग्रेस भवन, कार्यालय व जागा हडप करण्याचे कारस्थान,

कोपरगांव तालुका काँग्रेस भवन, कार्यालय व जागा हडप करण्याचे कारस्थान,

काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांचा थेट आरोप,

कोपरगाव,दि.१८.दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरातील काँग्रेस भवनाच्या दुरवस्थेचा मुद्दा अखेर उघडपणे समोर आला असून, या प्रकरणात गंभीर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी व्हिडिओ मुलाखतीतून काँग्रेस प्रेमी व हितचिंतकांसमोर धक्कादायक खुलासा करत काँग्रेस भवन, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साईबाबा मंदिर परिसरातील शासकीय जमीन हडप करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला आहे.

“काँग्रेस भवनाची अशी दुरवस्था का झाली, याचे खरे कारण जनतेसमोर यावे म्हणूनच ही मुलाखत दिली,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. अनेक नागरिक व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते भवनाबाबत विचारणा करत होते. त्यांना वस्तुस्थिती समजावी म्हणून पुराव्यासह हा खुलासा केल्याचा दावा त्यांनी केला.

शिंदे यांनी थेट आरोप करत म्हटले की, काहीजण आर्थिक गैरव्यवहारांवर पांघरूण घालत काँग्रेस भवन आणि त्याची जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. “कागदपत्रांत फेरफार करून जागेवर डोळा ठेवला जात आहे. हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी मुलाखतीत दिला.

दरम्यान, विद्यमान आमदार अशुतोष काळे व त्याच्या पत्नी यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “ते काँग्रेसचे कधीच नव्हते. त्यांनी कोपरगांव विधानसभेत प्रथम महिला आमदार सेन्हलताताई कोल्हे ,निवडून आल्या त्यावेळीस मा आमदार हे काँग्रेस तिकिटावर लढले नव्हते ,आणि पराभव पत्कारावा लागला यांनतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या तिकिटावर निवडणूक लढवली,” असे ते म्हणाले.

तसेच माजी आमदार आशोकदादा काळे हे शिवसेना पक्षाकडून निवडून आले होते, अशी आठवण करून देत “कर्मवीर शंकरराव काळे यांनी काँग्रेसकडून निवडून येऊनही कधी या भवनावर हक्क सांगितला नाही. मात्र आता कागदपत्रांत बदल करून ताबा घेण्याचा प्रयत्न नीतिमत्तेला धरून नाही,” असा घणाघात शिंदे यांनी केला.

“काँग्रेस भवन व जागेचा ताबा स्वखुशीने सोडावा. अन्यथा काँग्रेस प्रेमी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील,” असा इशारा देतानाच शिंदे यांनी स्पष्ट केले की, सध्या पक्ष कायदेशीर मार्गाने लढा देत आहे. “कोपरगाव तालुक्यात काँग्रेसची पकड आजही मजबूत आहे. कार्यकर्त्यांचा संयम हा आमच्यावरच्या विश्वासामुळे आहे,” असे ते म्हणाले.

आता या गंभीर आरोपांवर आमदार काळे काय भूमिका घेणार, याकडे कोपरगावकरांचे लक्ष लागून आहे. काँग्रेस भवन प्रकरणामुळे तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे   स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे....

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

error: Content is protected !!