Homeताज्या बातम्याकोपरगांव बाजार समितीतील भ्रष्ट कारभारावर चौकशीचा बडगा ! २० जूनला चौकशी पथक...

कोपरगांव बाजार समितीतील भ्रष्ट कारभारावर चौकशीचा बडगा ! २० जूनला चौकशी पथक दाखल होणार…

कोपरगाव, दि.१९ ( दिपक साटोटे )

कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीतील बोगस व भ्रष्ट कारभारासंदर्भातील गंभीर तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश नाशिक जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, येवला यांच्या आदेशानुसार गठीत चौकशी पथक,२० जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कोपरगांव बाजार समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देणार आहे.

काँग्रेस नेते विजय जाधव यांनी सादर केलेल्या तक्रारीमध्ये बाजार समितीच्या कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी व आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पुन्हा सहाय्यक निबंधक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना करण्यात आली.

संबंधित चौकशीसाठी बाजार समितीला मूळ अभिलेख, लेखी पुरावे आणि सचिवांचे स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित सचिवांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

तक्रारदार जाधव यांना सुध्दा या दिवशी समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून या चौकशी प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहिले जात असून, लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!