Homeताज्या बातम्याकोपरगाव तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नितीन शिंदे यांची निवड....

कोपरगाव तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नितीन शिंदे यांची निवड….

कोपरगाव,दि. ४ ( दिलीप गायकवाड )

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी नितीन मनोहर शिंदे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे नुकत्याच झालेल्या प्रदेशस्तरीय आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस कार्यकारी समिती सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संदीपकुमार, ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मागील काही निवडणुकांत रिक्त झालेल्या पदांची भर घालणे आणि सत्तेबाहेर गेल्यानंतर पक्षांतर्गत घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊन संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

२०१९ साली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षीय काळात प्रथमच नितीन शिंदे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली होती. त्या काळात त्यांनी केलेल्या विविध आंदोलने — महावितरणच्या विस्कळीत पुरवठ्याविरोधात, वनविभाग कार्यालयाच्या शिफ्टिंगविरोधात, रस्ते आणि ओला दुष्काळ अनुदानासाठी तसेच पाटपाण्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविल्याचे कौतुक बैठकीत करण्यात आले.

धर्मदाय आयुक्त कार्यालय, पुणे-नगर कार्यालये व छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात कोपरगाव काँग्रेस भवनच्या न्यायालयीन लढ्यांतही त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली. कोपरगाव तालुक्यातील विविध निवडणुकांत काँग्रेसची बाजू बळकट करण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना पुन्हा तालुका अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नितीन शिंदे म्हणाले, “सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आणि युवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती, रोजगार निर्मिती व गरीबांसाठी घरांच्या योजना राबवल्या. राहुल गांधी यांचे विचार युवकांना आजही प्रेरित करत आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकांत काँग्रेस ताकदीनिशी उतरेल.”

या वेळी शहराध्यक्ष तुषार पोटे, विष्णू पाटील पाडेकर, विजय जाधव, ज्ञानेश्वर भगत, रौणक अजमेरे, ॲड. शितल देशमुख, सौ. पुष्पा भगत, शब्बीर शेख, छोटू पठाण, सोपान धैनक, सोमनाथ पगारे, श्रीजय चांदगुडे, कैलास पंडोरे, निलेश चांदगुडे, मझर शेख,रवींद्र साबळेसर, राजू औताडे, नंदकुमार शिवरकर, सचिन होन, विलास गगे, विलास जाधव यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

“थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुका व जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी जोमाने काम करू,” असा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानत पक्षाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!