Homeताज्या बातम्याकोपरगावात भूमिगत गटारीच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरू

कोपरगावात भूमिगत गटारीच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरू

कोपरगाव.दि,२०( दिलीप गायकवाड )

कोपरगाव शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या शेजारी सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड व विनय भगत यांनी विजय जाधव आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामाची काही दिवसांपूर्वी समाजसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी संतप्त समाजसेवकांनी काम तात्पुरते बंद पाडत संबंधित ठेकेदार व नगरपालिका प्रशासनाला याबाबत इशाराही दिला होता.

मात्र, त्यानंतरही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही किंवा तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप समाजसेवकांनी केला आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आणि जनतेच्या पैशातून सुरू असलेल्या कामात होत

असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.

या आमरण उपोषणामुळे शहरातील राजकीय, सामाजिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी तिथे पोहोचत आहे, मला फक्त माझा स्वतःचा वेळ हवा आहे: मानस धामणे |...

पुणे: अव्वल दर्जाच्या टेनिसची गोडी लागलेल्या मानस धामणेला वाटते की तो फार मागे नाही आणि त्याने यश मिळवणे ही काळाची गरज आहे.कझाकस्तानमधील...

अंबिका नगरातील समस्यांवर तातडीने उपाययोजनांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

ठाणे : अजय मगरे वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर २ येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस महेश...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत पुण्यातील तंत्रज्ञांची ६२ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : सिंहगड रोड येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची (४९) ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी...

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

error: Content is protected !!