कोपरगाव, दि. २५ : विजय हलवाई
कोपरगाव येथील शुभ लाभ साप्ताहिक वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक व जेष्ट पत्रकार संजय लाड यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यलयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी लाड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नितीन शिंदे, सुदर्शन खंडागळे, प्रकाशराव आढाव, संजय सैदर्श, बहुजन शक्ती न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक दिलीप गायकवाड, पत्रकार दीपक साटोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त पाहुण्यांसाठी चहा व भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे लाड यांच्या कार्याचा गौरव झाला.




















