ठाणे,दि.२३.( प्रतिनिधी )
ठाणे रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात घडला. स्टेशन मास्तर यांनी अनाऊन्समेंट करून माहिती दिली की प्लॅटफॉर्म क्रमांक 07 वर आलेल्या महानगरी एक्सप्रेसच्या S-5 व S-6 कोचच्या खाली एक महिला पाय घसरून पडली आहे.
तत्काळ पोलिस व हमाल घटनास्थळी पोहोचले. महिलेला गाडीखालून बाहेर काढण्यात आले असता तिचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याचे आढळले. तसेच उजव्या गुडघ्याच्या वरची कातडी पूर्णपणे निघून आतला मास दिसत असल्याची गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताच्या वेळी महिला पूर्ण शुद्धीवर होती.
स्टेशन मास्तर यांचा मेमो घेऊन दोन हमालांच्या मदतीने जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अपघात विभागात ड्युटीवरील डॉ. दत्ता यांनी तत्काळ उपचार सुरू केले.
जखमी महिलेने आपले नाव सीमा शब्बीर शेख (वय 28 वर्षे, रा. शांतिनगर, मोफतलाल उपनी सुभीता चाळ, रोटीमंगर, कछवामो) असे सांगितले. तिच्या मोबाईलवरून वडिलांना संपर्क करून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली व त्यांना रुग्णालयात बोलावण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की महिलेचा हात पूर्णपणे वेगळा झाल्याने आणि येथे शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे हलविणे आवश्यक आहे. त्यानुसार महिलेच्या आई-वडिलांनी स्वतःच्या जबाबदारीवर तिला सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले.
दरम्यान, जखमी महिलेचा मोबाईल फोन तिच्या वारसांच्या ताब्यात देण्यात आला असून ती उपचारादरम्यान शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
*पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




















