Homeताज्या बातम्यानवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी ठेवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी ठेवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुंबई, दि. ७ : अजय मगरे

“नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गुन्हे सिद्धतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. या कायद्यांच्या प्रत्येक घटकाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात सर्वात पुढे राहील, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणी’ संदर्भात वर्षा निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “गुन्हा घडल्यानंतर तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना जलद शिक्षा मिळावी, हे या कायद्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळत असून जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.”

सीसीटीएनएस प्रणालीद्वारे इलेक्ट्रॉनिक एफआयआर न्यायालयाला थेट पाठवण्याची प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कारागृह व्यवस्थापनात सुधारणा म्हणून नागपूर आणि अमरावती येथे स्वतंत्र विभाग निर्माण करण्याचे तसेच नागपूर व वर्धा येथे नवीन कारागृह उभारणीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. ठाणे कारागृह निर्मितीचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

ई-साक्ष प्रणालीला एफआयआरशी संलग्न करण्याचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री म्हणाले, “तक्रारदाराला त्यांच्या तक्रारींची सद्यस्थिती एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा सुरू करावी. नागरिकाभिमुख सेवा देणे हेच आपल्या कामाचे केंद्रबिंदू असले पाहिजे.”

गुन्हा सिद्धतेत न्याय सहाय्यक प्रयोगशाळांच्या २५१ मोबाईल व्हॅन्स लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश देताना त्यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी उपक्रम नियमितपणे घेण्यावर भर दिला.

राज्यातील फौजदारी कायद्यांची सद्यस्थिती

राज्यातील २ लाख ८८४ पोलिस अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण

२१४८ न्यायालयीन कक्षांमध्ये आणि ६० कारागृहांमध्ये दूरदृष्टी संवाद प्रणाली उपलब्ध

ई-एफआयआर सुविधा सुरू, १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात ९५८ ई-एफआयआर दाखल

झिरो एफआयआर सुविधा अंतर्गत १२,३९८ प्रकरणांची नोंद (त्यात २,८७१ इतर राज्यांतील)

६० दिवसांच्या आत १,३४,१३१ गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र पोलिसांचे काम केवळ गुन्हे रोखणे नाही, तर न्यायदान प्रक्रिया सुलभ व परिणामकारक करणे हेही आहे. नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आदर्श ठरवणार आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

error: Content is protected !!