Homeताज्या बातम्यापैठण-खंडाळा मध्ये पेट्रोलचा भडका – दोन बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू...

पैठण-खंडाळा मध्ये पेट्रोलचा भडका – दोन बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू…

एकाच कुटुंबातील चार जण भाजले – नवरात्र उत्सवातील घटाजवळ घडली दुर्दैवी घटना

पैठण, दि.६ : अभिजीत सोनवणे

पैठण तालुक्यातील खंडाळा येथे नवरात्र उत्सवात देवीच्या घटाजवळ ठेवलेल्या पेट्रोलच्या बाटलीचा अचानक भडका उडाल्याने एकाच कुटुंबातील चार जण गंभीर भाजले होते. या अपघातातील दोन बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बुधवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील प्रकाश मोहन दळवी यांनी आपल्या मुलाच्या मोटारसायकलसाठी पेट्रोल बाटलीत काढून ठेवले होते. याच ठिकाणी नवरात्र उत्सवातील देवीचा घट ठेवण्यात आला होता आणि दिवा पेटलेला होता. दरम्यान, पेट्रोल ठेवलेल्या बाटलीचा अचानक भडका उडाला. यात प्रकाश दळवी, अविनाश दळवी, सुरेखा दळवी आणि आकाश दळवी हे चौघे गंभीर भाजले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र भाजण्याचे प्रमाण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचार सुरू असताना आकाश प्रकाश दळवी (वय १५) याचा रविवारी, दि. ५ ऑक्टोबर रोजी तर अविनाश प्रकाश दळवी (वय १४) याचा शनिवारी, दि. ४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटनास्थळी सपोनि सचिन पंडीत, विहामांडवा चौकीचे पो.उ.नि. श्रीहरी विजय बोबडे व बीट जमादार किशोर शिंदे यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेने खंडाळा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!