Homeताज्या बातम्यापैठण येथील नर्मदा कनिष्ठ महाविद्यालयाचा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश — विद्यार्थ्यांची झेप...

पैठण येथील नर्मदा कनिष्ठ महाविद्यालयाचा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश — विद्यार्थ्यांची झेप कौतुकास्पद

पैठण,दि.१७ (अजय मगरे )

नर्मदा कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, पैठण येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाचा झेंडा उंचावला आहे. नीट (NEET), जेईई (JEE) व सीईटी (CET) या प्रमुख स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप काळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, “स्पर्धा परीक्षा ही केवळ गुणांची शर्यत नसून ती व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया आहे. योग्य दिशा, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट गाठता येते.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. विलासाजी जाधव आणि सचिव सौ. कविता जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगताना परीक्षेच्या तयारीत सातत्य, वेळेचे योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात प्रा. चेतन गर्जे, प्रा. उद्धव ताठे, प्रा. साईनाथ भिसे, प्रा. अशोक गायकवाड, प्रा. चंद्रशेखर साळवे, प्रा. मनीषा पाचरणे, प्रा. स्वाती धुमाळ व प्रा. प्राजक्ता मोठे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन शिक्षकेत्तर कर्मचारी उमेश जाधव, अजय सातपुते व अवधूत काटकर यांनी केले.

यशस्वी विद्यार्थ्यां आणि परीक्षा

NEET परीक्षा: जगदीश चंद्रकांत खरात — ५४५ गुण,सायली ज्ञानेश्वर कपटी — ५३६ गुण,कार्तिक आबासाहेब एडके — ५२३ गुण,अविनाश ज्ञानेश्वर वडघणे — ४५९ गुण

JEE परीक्षा: कपिल प्रमोद चव्हाण — ८६%

CET परीक्षा: हर्षदा कल्याणराव गायकवाड — ९५.३०%, अर्पिता मुळे — ९०.७२%, आकंक्षा मुळे — ९०%, स्वामिनी पुरुषोत्तम राऊत — ८७.९२%, दिव्या गवळी — ७६% हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!