Homeताज्या बातम्याप्रतीक्षानगरातील म्हाडा रहिवाश्यांना मिळणार ‘महानगर पाईप गॅस’ जोडणी..

प्रतीक्षानगरातील म्हाडा रहिवाश्यांना मिळणार ‘महानगर पाईप गॅस’ जोडणी..

मुंबई, दि.१९ : मंगेश म्हात्रे

गेल्या अनेक वर्षांपासून सायन प्रतीक्षा नगरमधील नागरिकांनी ज्याची आस लावली होती, तो महत्त्वाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. विशेषत: म्हाडाच्या टी-लाईन व बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या तब्बल ५५०० कुटुंबांना आता महानगर पाईप गॅस जोडणीचा मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतीक्षा नगरमधील पायाभूत सुविधांतील उणिवा दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मा.नगरसेवक रामदास कांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला महानगर गॅस निगमकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते.

संक्रमण शिबिरासही मिळणार पाईप गॅस : टी-१ ते टी-६७ या सर्व टी-लाईन इमारतींसह बहुमजली इमारत क्र. १ ते २० मधील रहिवाश्यांना आता घरोघरी पाईप गॅस जोडणी मिळणार आहे. संक्रमण शिबिरातील नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून, त्यामुळे परिसरातील हजारो कुटुंबांना दैनंदिन जीवनातील मोठी सोय निर्माण होणार आहे.

“चार वर्षांच्या प्रयत्नांना यश!”:

या निर्णयाबाबत बोलताना मा. नगरसेवक रामदास कांबळे म्हणाले, “गेल्या चार वर्षांपासून आम्ही महानगर गॅस निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत होतो. गॅस जोडणी प्रक्रियेत होणारा विलंब दूर करण्यासाठी आम्ही वारंवार वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. अखेर दोन दिवसांपूर्वी कंपनीकडून गॅस जोडणी मंजूर केल्याचे पत्र मिळाले.”

महिलांसाठी मोठा दिलासा…

पाईप गॅस जोडणीमुळे विशेषत: महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. गॅस सिलेंडर संपल्यावर दुसऱ्या सिलेंडरची प्रतीक्षा करण्याची वेळ आता संपुष्टात येणार असून, सुरक्षित आणि सतत उपलब्ध असलेला पाईप गॅस नागरिकांना मिळणार आहे.

सायन प्रतीक्षा नगरमध्ये महानगर पाईप गॅस जोडणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून, या निर्णयामुळे परिसरातील ५५०० कुटुंबांचे दैनंदिन जीवन अधिक सुकर होणाच्या मार्ग मोकळा झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!