Homeताज्या बातम्याभरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी लुटले ; पंचवीस लाख रोकड...

भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी लुटले ; पंचवीस लाख रोकड लंपास .

पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारातील घटना;

पैठण, दि.१५.( सिद्धार्थ मगर )

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखे मधून दावरवाडी येथील शाखेत रोख रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन कर्मचाऱ्याच्या स्कुटीला पाठी मागून धडक देऊन व त्यांना दगड मारून त्यांच्या गाडीतील तब्बल पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा रस्त्यावर बँक कर्मचाऱ्याला लुटण्यात आले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत.

पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मधून सध्या दुष्काळी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. या रकमेसाठी दावरवाडी येथील बँकेत शेतकऱ्यांची मोठी पैसे काढण्यासाठी गर्दी झाली आहे, बँक कर्मचारी गणेश आनंद पहीलवान वय ६५ वर्षे हे शनिवारी सकाळी सव्वादहा वाजता आपल्या स्कुटी दुचाकी क्रमांक( एम एच 20 बी झे 8374) वरून तब्बल 25 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन निघाले होते, पाचोड- पैठण रस्त्यावरून येत असताना दावरवाडी शिवारात अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार पाठीमागून भरधाव वेगाने येत त्यांच्या स्कुटीला पाठी मागून धाड मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांच्या स्कुटीवर दगड मारून त्यांच्याकडे असणारे रोख पंचवीस लाख रुपये हिसकावून घेतले, या घटनेनंतर गणेश पहीलवान याने तात्काळ त्यांच्या शाखा अधिकाऱ्यांना झालेल्या घटनेची दूरध्वनीवरून माहिती दिली अन् संबंधित चोट्यांचा काही काळ पाटलाही केला,परंतु चोरट्यांनी डेरा मार्गी आपला मोर्चा वळून सुसाट वेगामध्ये त्या ठिकाणाहून पळ काढला, या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम बहाराते, पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत, पोलीस कर्मचारी संदीप वैद्य, अण्णासाहेब गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली चोट्यांचा मागवा काढला, तर या घटनेची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली असता तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पनव इंगळे, सपोनि.संतोष मिसाळे, विष्णू गायकवाड, विठ्ठल डोके,अशोक वाघ , शिवानंद बन्गे,अनिल काळे, राहुल गायकवाड, संनी खरात, योगेश तळमाळे यांनी सर्व घटनेची पाहणी करून विविध मार्गाने तपासाचे चक्र फिरवले आहे. तर मागील काही महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी दरोडा या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहेत. गंभीर गुन्ह्याचा मागील काही दिवसापासून तपास लागेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता चोट्यांचे मनबोल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस यंत्रणाही कुचकामी झाली काय असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाचोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे. या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत.

पोलीस यंत्रणा झाली कुचकामी..

मागील काही महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी दरोडा या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहेत. गंभीर गुन्ह्याचा मागील काही दिवसापासून तपास लागेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता चोट्यांचे मनबोल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस यंत्रणाही कुचकामी झाली काय असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाचोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.

पोलिसांसमोर मोठे आव्हान..!

गेल्या अनेक दिवसांपासून पाचोड पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण गुन्हेगारीच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून चोरी प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पाचोड पोलिसांना आरोपी पकडण्यासाठी प्रतिष्ठापणाला लागली आहे. यामुळे पाचोड पोलिसांना या गुन्हातील आरोपी पकडणे समोर एक मोठा आव्हान असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!