Homeताज्या बातम्याम्हाडा पुणे मंडळाच्या ४,१८६ घरांची 'लॉटरी' ११ नोव्हेंबर रोजी...

म्हाडा पुणे मंडळाच्या ४,१८६ घरांची ‘लॉटरी’ ११ नोव्हेंबर रोजी…

 अर्ज प्रक्रियेला ११ सप्टेंबर पासून सुरुवात…

मुंबई, दि. ११ : मंगेश म्हात्रे

गृहनिर्माण स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा पुणे मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता आजपासून अर्ज नोंदणी व भरणा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

या प्रक्रियेचा शुभारंभ पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. या वेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अर्ज नोंदणी व अनामत रकमेचा भरणा ११ सप्टेंबर दुपारी १२.३० वाजेपासून सुरू झाला असून ३१ ऑक्टोबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. १ नोव्हेंबर रोजी संबंधित बँकेच्या वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे रक्कम भरण्याची मुदत आहे. अर्जांची प्रारूप यादी ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल, हरकतीसाठी मुदत १३ नोव्हेंबर पर्यंत असून अंतिम यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.संगणकीय सोडत २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी काढण्यात येणार आहे.

या सोडतीत समाविष्ट सदनिकांचे चार गट :

म्हाडा गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) – १,६८३ सदनिका प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – २९९ सदनिका

१५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (पीएमआरडीए क्षेत्र) – ८६४ सदनिका

२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र) – ३,२२२ सदनिका

मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी सांगितले की, अर्ज करण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. ती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मदतीसाठी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक ०२२-६९४६८१०० वर संपर्क साधावा. त्यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

error: Content is protected !!