Homeताज्या बातम्याम्हाडा सेवांना गती देणार ‘म्हाडासाथी’ एआय चॅटबॉट" - संजीव जयस्वाल

म्हाडा सेवांना गती देणार ‘म्हाडासाथी’ एआय चॅटबॉट” – संजीव जयस्वाल

मुंबई, दि. १८ : मंगेश म्हात्रे

म्हाडा प्राधिकरणाचा नागरिकाभिमुख सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवत असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘म्हाडासाथी’ या एआय चॅटबॉट सेवेचे लोकार्पण गुरुवारी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

गुलजारीलाल नंदा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. जयस्वाल म्हणाले, “डिजिटायझेशनच्या युगात म्हाडा नागरिकांसाठी उपयुक्त, तंत्रज्ञानाधारित सेवा सातत्याने उपलब्ध करून देत आहे. ‘म्हाडासाथी’ हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.”

सुरुवातीला हा चॅटबॉट म्हाडाच्या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांना विविध विषयांवरील अचूक व विश्वासार्ह माहिती त्वरित मिळणार आहे. पुढच्या टप्प्यात ही सेवा मोबाईल प्लॅटफॉर्मवर सुरू होणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.

‘म्हाडासाथी’ हा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत उपलब्ध असून, म्हाडाच्या सर्व नऊ विभागीय मंडळांची माहिती यात मिळणार आहे. तसेच आवाजावर आधारित सुविधा असल्याने संवाद आणखी सुलभ होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा चॅटबॉट नागरिकांच्या प्रतिसादानुसार सतत विकसित केला जाणार आहे.

या माध्यमातून म्हाडा प्रकल्प, संगणकीय सोडत प्रणाली, निविदा, अर्जाची सद्यस्थिती, नवीन नियमावली यासह अन्य महत्त्वाची माहिती सहज उपलब्ध होईल. यामुळे वारंवार कार्यालयात येण्याची गरज कमी होईल व प्रतीक्षा वेळ टळेल.

यावेळी जयस्वाल यांनी सांगितले की, “नागरिक सुविधा केंद्रातील प्रतीक्षा कालावधी कमी करून तो आता केवळ ७-८ मिनिटांवर आणला आहे. पुढे नागरिकांना घरी बसूनच कागदपत्र पाठवता यावेत, यासाठीही नवी प्रणाली विकसित केली जात आहे.”

या लोकार्पण सोहळ्यास आर आर बोर्डाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, महेशकुमार जेसवाणी, ननावरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर, सह मुख्य अधिकारी उमेश वाघ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

error: Content is protected !!