Homeताज्या बातम्यासायन जीटीबी नगरचा पुनर्विकास रुस्तुमजी ग्रुप करणार..

सायन जीटीबी नगरचा पुनर्विकास रुस्तुमजी ग्रुप करणार..

रहिवाशांना मिळणार ६३५ चौरस फुटांचे घरे..

मुंबई, दि. ३० ( मंगेश म्हात्रे )

सायन जी.टी.बी. नगरमधील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम रुस्तुमजी ग्रुपच्या मे. किस्टोन रिअलटर्सकडे सोपवण्यात आले असून, या ऐतिहासिक प्रकल्पाचा प्रारंभ ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते स्वीकृती पत्र देऊन झाला.
वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, रुस्तुमजी ग्रुपचे अध्यक्ष बोमन इराणी, उपमुख्य अभियंता भूषण देसाई, राहुल व्हटकर आणि जी.टी.बी. नगरमधील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.

सन १९५८ मध्ये उभारलेल्या या वसाहतीतील २५ इमारतींमध्ये सुमारे १२०० कुटुंबे राहत होती. २०२० मध्ये बृहन्मुंबई महापालिकेने इमारती धोकादायक ठरवून पाडल्यामुळे रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित व्हावे लागले. रहिवाशांच्या मागणीनुसार, खाजगी मालकीच्या जमिनीवरील हा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अंतर्गत राबवण्यात येत आहे. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पास मान्यता मिळाली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारीला म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला.

प्रत्येक रहिवाशाला ६३५ चौरस फुटांचे घर मोफत मिळणार असून, पुनर्विकास पूर्ण होईपर्यंत दरमहा ₹२०,००० भाडे व पाच वर्षांसाठी देखभाल शुल्क म्हाडातर्फे दिले जाणार आहे. या प्रकल्पात म्हाडाला सुमारे २५,७०० चौ. मीटर क्षेत्र गृहसाठ्यासाठी प्राप्त होणार आहे.
जयस्वाल यांनी सांगितले की, हा खाजगी जमिनीवरील पहिलाच प्रकल्प असून, कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत राबविला जाणार आहे. प्रकल्पाचे मास्टर प्लॅनिंग सुरू असून, ५-७ सदस्यांची रहिवासी समिती नेमून कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाईल. रहिवाशांचे पुनर्वसन प्राधान्याने करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले की, या प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून, त्याचा फायदा भविष्यातील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये होईल.

आमदार कॅ. तमिल सेल्वन यांनी बीडीडी चाळीच्या धर्तीवर पुनर्वसन व्हावे अशी मागणी केली होती, ज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली. प्रकल्पाला सुरुवात होणे हे त्या निर्णयाचे फलित आहे, असेही ते म्हणाले.
हा प्रकल्प सिंधी निर्वासितांना न्याय देणारा आणि शहरातील पुनर्विकासाला नवा आयाम देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!