Homeताज्या बातम्याआरटीई प्रवेशातील १ कि.मी. अट रद्द करा; दादा भुसे यांना वंचित बहुजन...

आरटीई प्रवेशातील १ कि.मी. अट रद्द करा; दादा भुसे यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

मुंबई,दि.२५.( अजय मगरे )

राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर टी ई ) विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी घालण्यात आलेली १ कि.मी. अंतराची अट तात्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.

२००९ साली केंद्र सरकारने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा या उद्देशाने ‘राइट टू एज्युकेशन’ कायदा लागू केला. मात्र २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून शाळा प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही अट अन्यायकारक असून गरीब, कामगार, कष्टकरी, माथाडी, शेतमजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कुटुंबांतील मुलांवर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनेक वस्त्या व उपनगरांमध्ये १ कि.मी. अंतरात दर्जेदार शाळा उपलब्ध नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना निकृष्ट सुविधा असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल किंवा शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येईल. यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या मूळ उद्देशालाच तडा जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे आरटीई अंतर्गत नव्याने घालण्यात आलेली १ कि.मी. अंतर मर्यादा रद्द करून पूर्वीप्रमाणे ५ कि.मी. अंतर मर्यादा लागू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार व मुंबई-ठाणे जिल्हा समन्वयक महेश भारतीय यांनी केली आहे.

सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!