Homeताज्या बातम्याएअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरला असून, आर्थिक, मानसिक आणि व्यावसायिक असुरक्षिततेविरोधात देशभर आंदोलनाची ठिणगी पडली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे आंदोलन छेडण्यात आले आहे.

मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. “वर्षानुवर्षे सेवा देऊनही स्थैर्य नाही, वेतनाबाबत स्पष्टता नाही आणि भवितव्य अंधारात ढकलले जात आहे,” अशी तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनाला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) ने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटना रस्त्यावर उतरली असून, केंद्र सरकार आणि व्यवस्थापनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनस्थळी सिटूचे मुंबई जिल्हा सचिव कॉम्रेड शैलेंद्र चौहान, एफएसयूआयचे अखिल भारतीय महासचिव कॉम्रेड मनोज यादव तसेच सिटू महाराष्ट्र जनरल कौन्सिल सदस्य कॉम्रेड शैलेंद्र कांबळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देत, “कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा दिला.

दरम्यान, देशभरातील हजारो FTE कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिल्याने एअर इंडिया व्यवस्थापनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

error: Content is protected !!