Homeताज्या बातम्याकष्ट, जिद्द आणि चिकाटीची कहाणी: 

कष्ट, जिद्द आणि चिकाटीची कहाणी: 

सांची धनसरेने मिळवले दहावीत ९५.४० टक्के गुण.

मुंबई , दि १३ ( प्रतिनिधी )

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत राहणारी आणि आदर्श विद्यालयात शिकणारी सांची अनंत धनसरे हिने इ. १० वीच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळवून आपल्या कुटुंबाचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतून आणि आर्थिक अडचणींवर मात करत मिळवलेले हे यश सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे.

सांचीचे वडील अनंत धनसरे हे एका लघु दैनिकात पत्रकार म्हणून कार्यरत असून पुस्तक विक्री व प्रकाशन हे त्यांचे जोडधंदे आहेत. ते एक लेखक आणि जुन्या पुस्तकांचे संग्राहकदेखील आहेत. आई स्वाती ह्या गृहिणी असून संपूर्ण घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

घरची हलाखीची परिस्थिती, फी व वह्यापुस्तकांसाठी असलेली सततची धडपड, आणि आरोग्याची अडचण – अशा अनेक संकटांवर मात करत सांचीने १० वी मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. पायावर झालेली शस्त्रक्रिया आणि दीर्घकाळ एकाच जागी बसू न शकण्याची अडचण असतानाही तिने १५-१६ तास अभ्यास करून हे यश मिळवले आहे.

सांचीला लहानपणापासून वाचनाची व लेखनाची आवड आहे. तिने लिहिलेल्या कविता शाळेच्या वार्षिक पत्रिकेत प्रसिद्ध झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध, तसेच विज्ञान व प्रेरणादायी पुस्तकांचा अभ्यास ती करत असते. तिला भविष्यामध्ये चार्टर्ड अकाऊंटंट (CA) होण्याचे स्वप्न आहे.

“परिस्थितीशी झगडल्याशिवाय मार्ग सापडत नाही. रडत बसण्यापेक्षा प्रयत्न करत राहिले पाहिजे,” असे मत सांचीने व्यक्त केले.

सांचीच्या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

error: Content is protected !!