Homeताज्या बातम्याकिसन नगर व लोकमान्य नगर रहिवाशांसाठी महत्त्वाची सूचना..

किसन नगर व लोकमान्य नगर रहिवाशांसाठी महत्त्वाची सूचना..

हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली..

ठाणे, दि.२६ : अजय मगरे

किसन नगर, हनुमान नगर, अंबिका नगर तसेच लोकमान्य नगर परिसरातील रहिवाशांसाठी ठाणे महापालिकेकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. समूह विकास योजनेअंतर्गत तयार केलेल्या प्रारुप याद्यांवरील हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत वाढवून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या क्लस्टर सेलतर्फे नागरी पुनरुत्थान आराखडा (यु.आर.पी) क्र. १२ व १३ अंतर्गत या भागातील भोगवटाधारकांचे सर्वेक्षण करून तयार केलेली यादी १६ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत नाव, हक्क किंवा माहिती संदर्भात कोणाला काही हरकत अथवा सूचना द्यायची असल्यास त्यांनी ती आता १५ सप्टेंबरपर्यंत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
किसन नगर, हनुमान नगर, अंबिका नगर (यु.आर.पी क्र. १२ – यु.आर.सी. क्र. ४ व ६)

लोकमान्य नगर परिसरातील खुशबु अपार्टमेंट ते हरी ओम अपार्टमेंट, शास्त्री नगर, वर्तक नगर, यशोधन नगर, डवले नगर, लोकमान्य पाडा क्र. २ (यु.आर.पी क्र. १३ – यु.आर.सी. क्र. ३)

हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या क्लस्टर सेल, शहर विकास विभाग, धर्मवीर आनंद दिघे प्रशासकीय इमारत, कशिश पार्क, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.) या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा clustercell@thanecity.gov.in या ई-मेलवरही माहिती पाठवता येईल. नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून, वेळेत हरकती/सूचना नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी मिलिंद पाटील व किशोर गोळे यांनी ठाणे महापालिका संकेत स्थळावर प्रसिध्द केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!