Homeताज्या बातम्याठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा;  नद्यांची पातळी वाढली, रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत

ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा;  नद्यांची पातळी वाढली, रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत

ठाणे, दि. १९ : अजय मगरे

ठाणे जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ८७.३ मि.मी. इतके नोंदवले गेले असून आतापर्यंत १९२९.९ मि.मी. (७९.३१%) पावसाची नोंद संध्याकाळी ५ वा. झाली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदी (जांभुळपाडा परिसर) ने इशारा पातळी ओलांडली असून इतर नद्यांची पातळी अद्याप इशार्‍याखाली आहे.

धरण साठा : बारवी धरण : १००% भरले, ११ गेट उघडले. तानसा धरण : १००% भरले, २१ गेट उघडले. भातसा धरण : ९३.१३% भरले, ५ गेट व पॉवर आउटलेट २ गेट उघडले. मोडक सागर धरण : ९४.१२% भरले.

पुरस्थिती : तुर्भे (ठाणे तालुका) : EVM वेअरहाऊस परिसरात पाणी साचल्याने नवी मुंबई महापालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केला. काटई (कल्याण तालुका) : ११ गाळे व १० घरे पाण्याखाली, अंशतः नुकसान. नांदिवली (कल्याण) : साई कमल सोसायटीतील तळमजल्यावरील १६ रूमपाण्यात. काटेमानिवली (कल्याण) : शिवाजी नगर व वालधुनी परिसरातील अंदाजे १२-१३ घरे तसेच वृंदावन शिवकृपा चाळ, महालक्ष्मी शॉपी येथे ७-८ घरांमध्ये पाणी शिरले.

रेल्वे वाहतूक : ठाणे-कल्याण-कसारा मार्गावर ३० मिनिटे उशीर. ठाणे-कल्याण-कर्जत मार्गावर ३० मिनिटे उशीर. ठाणे-पनवेल-वाशी हर्बर मार्गावर वाहतूक सुरळीत.

दरड दुर्घटना : (ठाणे, लोकमान्यनगर) : पाण्याच्या टाकीमागे पाडा क्र. ४ येथे दरड कोसळून जय मातेरे यांच्या घरावर व शेजारच्या घरावर नुकसान झाले. यात श्री. अमरनाथ शर्मा (वय ७०) जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचार सुरू आहेत.

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!