कोपरगाव, दि.११.( दिलीप गायकवाड )
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव नगरपरिषद संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात ११ एप्रिल २०२६ रोजी वाचकांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. सुरेश मोकळ यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मा. आमोल पवार, बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप गायकवाड, संपतराव माळी, भिकन बिसमिल्ला शेख, फानिस शिंगारे, रविंद्र धनराळे, कोडीराम काळे, दत्तात्रय निकम आदी वाचक उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. सुरेश मोकळ यांनी महात्मा फुले यांच्या समाजप्रबोधन व शिक्षणविषयक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत विचार मांडले. तर दिलीप गायकवाड यांनी महात्मा फुले यांना अभिवादन करून उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.




















