Homeताज्या बातम्यानीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप….

मुंबई, दि.१९.( अजय मगरे )

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद साधत जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मेट्रोमधून प्रवास करत प्रवाशांना पत्रके वाटली. या पत्रकांमध्ये देशभरात समोर आलेल्या विविध पेपरफुटी प्रकरणांची माहिती, अटक आरोपींची पार्श्वभूमी तसेच कथित राजकीय संबंधांचा उल्लेख करण्यात आला होता.

यावेळी कार्यकर्त्यांनी “पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील चूक नसून संघटित भ्रष्ट व्यवस्थेचा भाग आहे,” असा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या प्रकारामुळे देशातील तरुणांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

“विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात; मात्र सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणाखाली पेपर विकले जात असतील, तर सामान्य विद्यार्थ्यांनी न्याय कुठे मागायचा?” असा सवाल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची पेपरफुटी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लाखो विद्यार्थ्यांचे करिअर आणि पालकांची स्वप्ने भ्रष्ट रॅकेटमुळे उद्ध्वस्त होत आहेत. देशातील तरुणांना न्याय देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.”

पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा दिलेला नसल्याबद्दलही टीका केली.

देशातील स्पर्धा परीक्षांभोवती भ्रष्टाचाराचे जाळे निर्माण झाले असून बेरोजगारीने त्रस्त तरुणांच्या भविष्याशी क्रूर खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही युवक काँग्रेसने दिला.

दरम्यान, या मोहिमेला मेट्रो प्रवाशांनीही प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले. मोहिमेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!