Homeताज्या बातम्या"भारताचा अभिमान! मलेशियात पारा तायक्वांदो स्पर्धेत आनंद धोंडे यांचे सुवर्ण यश”

“भारताचा अभिमान! मलेशियात पारा तायक्वांदो स्पर्धेत आनंद धोंडे यांचे सुवर्ण यश”

मुंबई, दि ७ : प्रतिनिधी

मलेशियातील कुचिंग येथे पार पडलेल्या दहाव्या आशियन पारा तायक्वांदो पूम्से चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताचा खेळाडू आनंद मारुती धोंडे यांनी सुवर्णपदक जिंकत भारताचा झेंडा उंचावला.

आशियातील अनेक देशांतील अव्वल पारा तायक्वांदो खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या या स्पर्धेत धोंडे यांनी उत्कृष्ट तंत्र, वेगवान हालचाली यांचा प्रभावी वापर करत सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. अंतिम फेरीत त्यांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाची खात्री केली.
सुवर्णपदक जिंकत भारताचा झेंडा उंचावणारे आनंद धोंडे यांचा मुंबईत फिनिक्स मार्शल आर्ट क्लास तर्फे भव्य सत्कार करण्यात आला.

धोंडे यांच्या सुवर्ण विजयाने भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळवून दिला. या सत्कार सोहळ्यात फिनिक्स मार्शल आर्ट क्लासचे प्रशिक्षक राजेश खिल्लारी सर,सहकारी खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धोंडे यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

भारताच्या पारा तायक्वांदो संघाने या स्पर्धेत एकूण १६ पदके जिंकली. धोंडे यांनी या यशाचे श्रेय आपल्या प्रशिक्षक ,कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना देत, “हे सुवर्णपदक मी माझ्या देशाला आणि मला साथ देणाऱ्या सर्वांना समर्पित करतो” असे सांगितले.

या सुवर्ण कामगिरीनंतर त्यांच्या मूळ गावात आणि क्रीडा क्षेत्रात जल्लोषाचा माहोल असून, अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!