Homeताज्या बातम्याभुयारी गटार योजनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी आंदोलन स्थगित..

भुयारी गटार योजनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी आंदोलन स्थगित..

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरातील भुयारी गटार योजनेतील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ‘माझं गाव माझं अभियान’ सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर आज स्थगित करण्यात आले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. पराग संधान यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडविले.

दि. २० रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भरत मोरे, अनिल गायकवाड, विनायक भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषणास प्रारंभ केला होता. भुयारी गटार लाईनच्या कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती.

आज दि. २२ रोजी नगराध्यक्ष मा. पराग संधान, नगरउपाध्यक्ष जितेंद्र रनशूर, गटनेते प्रमोद आढाव तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. सुहास जगताप यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून पुढील कामकाज नियमाप्रमाणे केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष संधान यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात भुयारी गटार योजना राबविण्यात येत आहे. सुमारे २२७ कोटी ४५ लाख ७५ हजार ९१९ रुपयांचा हा प्रकल्प असून, सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरसूचीप्रमाणे हे काम गुजरात येथील मंगुकिया ब्रदर्स प्रोजेक्ट अँड जयंती सुपर (जे. व्ही.) या कंपनीस देण्यात आले आहे. या प्रकल्पास २७ ऑगस्ट २०२४ रोजी तांत्रिक मंजुरी, तर १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पाबाबत आक्षेप घेत ‘माझं गाव माझं अभियान’च्या कार्यकर्त्यांनी उपोषण पुकारले होते. नगराध्यक्ष पराग संधान व मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मध्यस्थीमुळे अखेर हे आंदोलन शांततेत स्थगित झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरातील समस्यांवर तातडीने उपाययोजनांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

ठाणे : अजय मगरे वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर २ येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस महेश...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत पुण्यातील तंत्रज्ञांची ६२ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : सिंहगड रोड येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची (४९) ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी...

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

error: Content is protected !!