Homeताज्या बातम्यामुंबईत १४९ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी म्हाडाचा ई-लिलाव;  अर्ज...

मुंबईत १४९ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी म्हाडाचा ई-लिलाव;  अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्टपासून सुरू

मुंबई, दि. ७ : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या मुंबईतील विविध प्रकल्पांमधील १४९ अनिवासी गाळ्यांची विक्री ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार असून, त्यासाठी १२ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

या ई-लिलावात मुंबईतील विविध ठिकाणांवरील गाळे विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यामध्ये प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे:

मालवणी मालाड – ४६ गाळे

कोपरी पवई व चारकोप – प्रत्येकी २३ गाळे

बिंबिसार नगर, गोरेगाव – १७ गाळे

प्रतीक्षा नगर, सायन – ९ गाळे

मुलुंड गव्हाणपाडा, जुने मागाठाणे, महावीर नगर, कुर्ला स्वदेशी मिल, तुंगा पवई – काही प्रमाणात गाळे

तसेच अँटॉप हिल, वडाळा, शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी, जोगेश्वरी येथे प्रत्येकी १ गाळा उपलब्ध आहे.

ई-लिलाव प्रक्रिया व निकाल :

पात्र अर्जदारांसाठी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन बोली प्रक्रिया पार पडेल. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निकाल निकाल https://eauction.mhada.gov.in आणि https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येईल.

अर्ज प्रक्रियेची माहिती :

अर्ज भरण्याची मुदत – १२ ऑगस्ट दुपारी १२ पासून ते २५ ऑगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत

नोंदणी, कागदपत्रे अपलोड व अनामत रक्कम भरणे ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक

१८ वर्षांवरील व्यक्ती अर्ज करू शकतात महाराष्ट्रातील २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक ऑफसेट किंमतीनुसार विहित अनामत रक्कम भरावी लागेल..

अधिक माहिती व अर्ज पोर्टल :

संपूर्ण माहिती, पात्रता निकष, सामाजिक आरक्षण, गाळ्यांचे विवरण, अटी व शर्ती, अर्ज प्रक्रिया इ. बाबींसाठी https://eauction.mhada.gov.in आणि https://mhada.gov.in > Lottery > Eauction > eauction या पोर्टलवर माहिती उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

error: Content is protected !!