ठाणे, दि.२८ : अजय मगरे
एम.एम.आर.डी.ए. मार्फत सुरू असलेल्या मेट्रो-04 प्रकल्पाच्या कामामुळे घोडबंदर मार्गावरील आनंदनगर सिग्नल परिसरात काही दिवस वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
29 ऑगस्ट 2025 ते 3 सप्टेंबर 2025 या कालावधीत रात्री 11.55 वाजल्यापासून पहाटे 4.00 वाजेपर्यंत मेट्रोचे सहा कोच रेल्वे ट्रॅकवर ठेवण्याचे काम होणार आहे. या काळात सर्व प्रकारची वाहने सर्व्हिस रोडकडे वळवली जाणार आहेत.
आनंदनगर सिग्नलवरून घोडबंदरकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील.
*पर्यायी मार्ग* – जड वाहनांनी आनंदनगर सिग्नलवरून डावीकडे वळून, परदेशी बाबा दरगाह येथे यु-टर्न घेऊन पुन्हा मुख्य सत्य रोडमार्गे प्रवास करावा.
हलकी वाहने डावीकडे वळून, परदेशी बाबा दरगाह – सेवन स्क्वेअर स्कूल – वेदांत हॉस्पिटलमार्गे पुढे जाऊ शकतील.
ही अधिसूचना पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहनं आणि अन्य अत्यावश्यक सेवांसाठी लागू होणार नाही.
नागरिकांनी या कालावधीत प्रवास करताना थोडी खबरदारी घ्यावी व पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाचे पुलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.




















