Homeताज्या बातम्याम्हाडाची सोलापूरमध्ये हिरवाईसाठी मोठी झेप...

म्हाडाची सोलापूरमध्ये हिरवाईसाठी मोठी झेप…

 ‘रे नगर’ प्रकल्पात २० हजार झाडांची लागवड सुरू

सोलापूर, दि.१९ : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे सोलापूरच्या कुंभारी येथील ‘रे नगर’ प्रकल्प परिसरात आज वन महोत्सवाच्या निमित्ताने २० हजार स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते झाला.

म्हाडातर्फे सामाजिक बांधिलकी जपत आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प करत राज्यभर दोन लाख झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘रे नगर वसाहत’ प्रकल्पात स्थानिक प्रजातींच्या २-३ वर्षांची झालेली सुमारे २० हजार झाडे लावण्यात येत आहेत. लागवड क्षेत्र कुंपण व संरक्षक उपायांनी सुरक्षित करण्यात आले आहे.

‘रे नगर’ हा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राज्यातील सर्वात मोठा ३० हजार घरांचा प्रकल्प असून त्यातील १५ हजार घरे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत. उर्वरित प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे.

यावेळी जयस्वाल यांनी प्रगत कामांचा आढावा घेतला. तसेच स्थलांतरित लाभार्थ्यांना रोजगार देण्यासाठी गारमेंट मिल, बीडी युनिट व पापड फॅक्टरी असोसिएशन्ससोबत चर्चा करून डिसेंबरपर्यंत रोजगारनिर्मितीच्या प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू करण्याचे आश्वासन दिले. या माध्यमातून १५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

वन महोत्सव उपक्रमांतर्गतच पुणे मंडळाने सोलापूर शहरातील दहिटणे येथील ‘राष्ट्रतेज अटल’ गृहनिर्माण प्रकल्पातही १,२०० झाडांची लागवड केली असून लवकरच या प्रकल्पातील घरे लाभार्थ्यांना सुपूर्द होणार आहेत. येथे आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ई-लायब्ररी, सौरऊर्जा दिवे, खेळणी व ओपन जिमसारख्या सुविधा देण्याचे आश्वासनही श्री. जयस्वाल यांनी दिले.

या कार्यक्रमाला आमदार विजय देशमुख, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, राहुल साकोरे, मुख्य अभियंता सुनील ननावरे, अजयसिंह पवार, सह मुख्य अधिकारी उमेश वाघ, वंदना सूर्यवंशी, मुख्य अधिकारी रेवती गायकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!