Homeताज्या बातम्यादक्षता विभागाच्या चौकशीनंतर उघडकीस आला म्हाडाचा मास्टर लिस्ट घोटाळा....

दक्षता विभागाच्या चौकशीनंतर उघडकीस आला म्हाडाचा मास्टर लिस्ट घोटाळा….

१९ बोगस रहिवाशी आणि अभियंत्यांवर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

मुंबई, दि.५ : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये बनावट नावे घालून मोक्याच्या ठिकाणच्या सदनिकांचा लाभ घेतल्याचा घोटाळा दक्षता विभागाच्या चौकशीनंतर उघडकीस आला आहे. आर आर बोर्डाचे मिळकत व्यवस्थापक अवधूत बेळणेकर यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

दक्ष नागरिक जयश्री ढगे यांच्या तक्रारीवरून मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशीत सुरेश चिकणे यांच्या यादीत १५ बनावट नावे आढळली, ज्यात १३ जणांनी प्रत्यक्ष म्हाडाच्या सदनिकांचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. कार्यकारी अभियंता बी-२ यांनी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) यांच्याकडून मागवलेल्या मूळ यादीत फक्त ६३ अधिकृत रहिवाशांची नावे असतानाच चिकणे यांच्या यादीत अनधिकृत १५ नावे वाढवण्यात आली होती.

म्हाडा अंतर्गत मोडकळीस आलेल्या आणि पुनर्वसनासाठी पात्र ठरलेल्या इमारतींच्या पुनर्वसनासाठी ‘बृहतसूची समिती’मार्फत गाळे वाटप केले जाते. मात्र १९९२ ते २०२१ या काळात १९४-१९६ नरसिनाथा स्ट्रीट, ११७ सॅम्युएल स्ट्रीट आणि २०५-२०७ नरसिनाथा स्ट्रीट या इमारतींबाबत बनावट दस्तऐवज सादर करून काही व्यक्तींनी खोट्या भुसंपादन याद्यांमध्ये आपली नावे समाविष्ट केली आणि गाळे मिळवले.

या प्रकरणात संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी कागदपत्र तपासणी न करता अहवाल दिला असून बृहतसूची समितीनेही मूळ यादी पडताळणी न करता पात्रता दिल्यामुळे शासनाची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर व्यक्तींविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासनास नुकसान पोहोचवणे अशा भादंसं ४२०,४६५,४६७,४६८,४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीत सहभागी रहिवाशांची नावे आणि त्यांनी लाटलेली घरे पुढील प्रमाणे: सुरेश चिकणे (सुमेर पार्क, माझगाव), फालीमा लुईस (१५०७ परेल), हाजरा मलिक (प्रफुल सोसायटी, माझगाव), युसुफ मोहम्मद सय्यद (वेलिंग्टन व्हिव, मुंबई सेंट्रल), गंगाराम सकपाळ (सुमेर पार्क, माझगाव), शालिनी कवटेकर ( दादरकर कंपाऊंड,ताडदेव), तानाजी तावडे (प्रफुल सोसायटी, चिंचपोकळी), लक्ष्मण दळवी (उत्पल पार्क ,माहीम), आयेशा अन्वर शेख (लक्ष्मी नारायण बिल्डिंग, प्रभादेवी), पियुश दोशी (ओम रेसिडेन्सी, परळ), दिलीप बने (आयनेस टॉवर ,मोरी रोड माहीम), हिराबाई कदम (प्रफुल सदन, काळाचौकी), युसुफ-मुर्तुजा जावरावाला (प्रफुल सोसायटी चिंचपोकळी), राजेश दळवी (मिलन सोसायटी, वरळी), दत्ताराम फाटक (शीतलादेवी सदन ,माझगाव), बबन डोंगरे (ओंकार बिल्डिंग, काळाचौकी), नामदेव फाटक (मराठा सोसायटी, चिंचपोकळी), बालाराव भोसले (५५७ माटुंगा विभाग) यांचा पोलिस एफआयआर समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

error: Content is protected !!