Homeताज्या बातम्याविद्यापीठ प्रशासनाचा बौद्ध समाजाशी विश्वासघात?" कुलगुरूंचे आश्वासन हवेत...

विद्यापीठ प्रशासनाचा बौद्ध समाजाशी विश्वासघात?” कुलगुरूंचे आश्वासन हवेत विरले;

भंते विमांसा यांचे धरणे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच

मुंबई, दि.२५ : अजय मगरे

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूंनी २०२३ मध्ये पाली विभागास जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. हा शब्द फिरवून कुलगुरूंनी इराणी भाषांच्या विभागात जागा देण्याचे जाहीर केले आहे. हा बौद्ध समाजाशी विश्वासघात असून कुलगुरूंचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप भंते विमांसा यांनी केला आहे.

पाली विभागास अनुदान जाहीर करावे आणि भंतेंचा छळ थांबवावा, या मागणीसाठी भंते विमांसा यांचे विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर गेले पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

मुंबई विद्यापीठाकडून पाली विभागावर होत असलेल्या अन्यायाविरोधात व विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून भंते विमांसा यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.

भंते विमांसा म्हणाले की, “१९१२ मध्ये धर्मानंद कोसंबी यांनी स्थापन केलेला पाली विभाग हा आमच्या बौद्ध अस्मितेचा वारसा आहे. पण विद्यापीठ प्रशासन हा विभाग संपवण्याचा प्रयत्न करत आहे.

पाली विभागास अद्याप ॲडेड दर्जा मिळालेला नाही, उलट अवेस्ता पहेलवीसारख्या नव्याने उभ्या केलेल्या विभागांना प्राधान्य दिले जात आहे. हे आमच्या संस्कृतीशी व समाजाशी विश्वासघात करणारे पाऊल आहे.”त्यांनी आणखी सांगितले की, “विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात केवळ ८० जागा आहेत. उर्वरित ३०० विद्यार्थ्यांना जागा नाकारली जाते. अशा परिस्थितीत गरीब व ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांचे शिक्षण थांबते. हा सरळ अन्याय असून, आम्ही तो सहन करणार नाही.”

भंते विमांसा यांचे हे धरणे आंदोलन पूर्णतः शांततेत, मौन व ध्यानधारणेच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र पाच दिवस उलटूनही विद्यापीठ प्रशासन मौन बाळगत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व समाजात संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, विविध भिक्षू, भिक्षुणी, विद्यार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी भेट देत आहेत. भंते विमांसा यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जोपर्यंत पाली विभागाला स्वतंत्र जमीन, ॲडेड दर्जा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!