Homeताज्या बातम्याजायकवाडी धरणावर महाविकास आघाडी तर्फे जलपूजन

जायकवाडी धरणावर महाविकास आघाडी तर्फे जलपूजन

पैठण, दि.२४. ( अभिजीत सोनवणे )

पैठण येथील जायकवाडी नाथसागर धरणावर महाविकास आघाडी तर्फे जलपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार डॉ. कल्याण काळे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी खासदार चंद्रकांत खैरे व माजी आमदार संजय पा. वाघचौरे यांच्या हस्ते गोदावरी मातेला साडी–चोळी अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, “सध्या जायकवाडी धरणातून पाणी सोडले जात आहे. हेच पाणी खेरडा कालव्यात सोडले गेले तर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”

माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “धरणात पाणी असतानाही वेळेवर सोडण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही रस्ता रोको आंदोलन केले, गुन्हेही दाखल झाले. पैठण सोसायटीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आता वरील धरणातून पाणी सोडले गेले आणि विरोधकांच्या हस्ते पूजन झाले. त्यामुळे आमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती झाली. म्हणूनच आम्ही भूमिपुत्र आणि आंदोलनकर्त्यांच्या हस्ते जलपूजन केले आहे.”

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या वेळी सांगितले की, “माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच जायकवाडी धरण उभारले गेले असून या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना मिळतो आहे.”

या जलपूजन सोहळ्यास माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते दत्ता गोर्डे, माजी जि.प. अध्यक्ष हरिश्चंद्र लघाने, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश सचिव रविंद्र काळे, मराठवाडा ओबीसी विभाग अध्यक्ष कांचनकुमार चाटे, काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद पा. तांबे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे, माजी सभापती मोहम्मद हनीफ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गुलदाद पठाण, शहराध्यक्ष निमेश पटेल, शिवसेना शहरप्रमुख अजय परळकर, माजी नगराध्यक्ष राखिताई परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष उमेश पंडूरे, तसेच विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!