Homeताज्या बातम्याएमएसआरडीसीचे रस्ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

एमएसआरडीसीचे रस्ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ६ : मंगेश म्हात्रे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून राबविण्यात येणारे सर्व प्रकल्प वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावेत, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम (राजमार्ग) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

निर्मल भवन, नरिमन पॉईंट येथील ‘एमएसआरडीसी’ कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहसंचालक मनूज जिंदल, भू-सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक रामदास खेडेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, “नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीच्या सुलभतेसाठी काटेकोर नियोजन करून कामे करावीत. प्रकल्पाच्या गतीमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “रस्ते प्रकल्पांमुळे प्रवासाचे अंतर कमी होणार असून, वेळ आणि इंधनाची बचत होईल. नागरिकांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.”

या बैठकीत रेवस–रेड्डी राष्ट्रीय महामार्गातील गुहागर तालुक्यातील १३ ते १५ कि.मी. रस्त्याचे पुनःसर्वेक्षण व फेररचना, विरार–अलिबाग महामार्ग, नाशिक रिंग रोड (वर्तुळाकार रस्ता) तसेच भंडारा–गडचिरोली द्रुतगती महामार्ग या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगती अहवालांचे सादरीकरण करण्यात आले.

या वेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!