Homeताज्या बातम्याकोपरगाव गोदावरी नदीचे पाणी भीषण प्रदूषित : संजय काळे यांचा गंभीर आरोप

कोपरगाव गोदावरी नदीचे पाणी भीषण प्रदूषित : संजय काळे यांचा गंभीर आरोप

कोपरगाव, दि.८.( दिलीप गायकवाड )

कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे तसेच कालव्यांचे पाणी अत्यंत भीषण स्वरूपात प्रदूषित झाले असल्याचा गंभीर आरोप सामाजिक नेते संजय काळे यांनी केला आहे. गोदावरी नदीत नारंदी, गारदा या उपनद्या तसेच विविध नाले, ओढे आणि शहरातील गटारांमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्यामुळे नदी व कालव्यांचे पाणी वापरण्यायोग्य राहिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय काळे यांनी गेल्या आठवड्यात गोदावरी नदी, कालवे, नारंदी व गारदा नाल्यातून विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्राप्त अहवालानुसार कालव्याच्या पाण्यात क्षारता, बायकार्बोनेट, क्लोराईड यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून आले आहे. गोदावरी नदीतील पाण्यातही हे घटक मर्यादेपेक्षा अधिक असल्याने हे पाणी शेतीसाठी वापरल्यास शेतजमिनीचे दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

गारदा नाल्यात संजीवनी कारखाना, गोदावरी डेअरी, महाविद्यालये तसेच औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी थेट सोडले जात असल्याचा आरोप करत, गारदा नाल्याचा अहवाल अत्यंत धोकादायक असल्याचे काळे यांनी सांगितले. नारंदी नदीचे पाणीही अत्यंत दूषित असून त्यात रासायनिक घटकांचे प्रमाण जास्त असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रदूषित पाण्यामुळे शेती, पशुधन, जलचर जीवसृष्टी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे पाणी जमिनीत मुरल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून दीर्घकालीन आजारांना आमंत्रण मिळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

गोदावरी नदी व कालवे हे कोपरगाव तालुक्याच्या विकासाची मुख्य शिरा असून त्यांचे संरक्षण आणि प्रदूषणमुक्ती तातडीने होणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घेऊन सांडपाणी थेट नदीत सोडण्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गॅस गळतीनंतर रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास, फक्त एकाला ऑक्सिजनच्या आधाराची गरज: डॉक्टर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या प्लॉटवरील पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूच्या गळतीमुळे सायबानगरमधील अनेक रहिवाशांना गुरुवारी पहाटे मळमळणाऱ्या दुर्गंधीमुळे जाग आली...

Pune Gas Leak: पुण्यातील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

रस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत! बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री

मुंबई, दि.३०.(प्रतिनिधी) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत “रस्त्यावरचा आवाज...

बारा वर्षांनंतर उलगडा! अपहरणानंतर खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे तिघे जेरबंद

ठाणे, दि.३०.( अजय मगरे ) २०१४ साली अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी गाव) यांच्या प्रकरणाचा तब्बल बारा वर्षांनंतर धक्कादायक उलगडा झाला...

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

error: Content is protected !!