महिलांना आले पुन्हा, जुने दिवस !
दावरवाडी, दि.१२ (अभिजीत सोनवणे)
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर दिसु लागले आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम घरगुती वापराच्या वस्तूवर होत असुन, घरगुती गैस सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे मासिक बजेट कोलमंडले आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. विशेषत ग्रामीण भागात या परिस्थितीचे गंभीर परिणाम दिसून येत आहे.
गैस सिलेंडरच्या किंमतील झालेल्या वाढीमुळे अनेक कुटुंबांना घरखर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना पुन्हा पारंपारिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गैस सिलेंडर महागल्यामुळे अनेक घरांमध्ये चुलीचा वापर वाढत्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. लाकुडफाटा किंवा शेणकांडयाच्या साहाय्याने स्वयंपाक करण्याची पध्दत पुन्हा सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. गैसच्या वाढत्या किंमतीमुळे महीन्याचा खर्च सांभाळणे अधिक कठीण झाले आहे. आधीच धान्य, भाजीपाला आणि ईतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. त्यांमुळे अनेक महिलांना धुराचा त्रास सहन करत पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. यामुळे आरोग्याचाही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गैस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने गैस सिलेंडर दरावर नियंत्रण आणावे आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाढत्या पार्श्वभूमीवर गैस दरवाढीचा प्रश्न आता ग्रामीण भागातील कुटुंबासाठी मोठी चिंता बनली आहे.
चौकट
{ गैस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा संताप
आधीच दाळी, तेल, आणि भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात आता गैस सिलेंडर ६० रुपयांनी महागल्याने महिन्याचे गणित कसे जुळवायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे;
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सर्वसामान्यांना बसत असुन, व्यावसायिक गैसनंतर घरगुती गैसच्या दरातही वाढ झाली आहे. बुकिंग केलेल्या ग्राहकांनाही वाढीव दरानेच पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे अचानक वाढलेल्या या दरांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे..



















