Homeताज्या बातम्याटाकळी फाटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू – नागरिकांचा रोष, रस्तारोको आंदोलन.

टाकळी फाटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू – नागरिकांचा रोष, रस्तारोको आंदोलन.

कोपरगाव, दि.६ : दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरालगतच्या टाकळी फाटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात रस्तारोको आंदोलन छेडले.

ही घटना टाकळी फाटा जवळील ओढ्याच्या काठावर घडली. उसतोडीच्या कामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपडीसमोर खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून बालिकेला उचलून नेले. नागरिकांच्या आरडाओरडीनंतर बिबट्याने बालिकेला सोडले, मात्र गंभीर जखमी अवस्थेत तिला वाचवता आले नाही.

घटनास्थळी कोपरगाव ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ दाखल झाले. रागावलेल्या ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ठिय्या देत वनविभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मृत बालिकेचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

स्थानिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे. “गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून येसगाव, जेऊर कुंभारी, डाऊच अशा गावांत जनावरांवर आणि आता माणसांवरही हल्ले वाढले आहेत. तरीही प्रशासन झोपेत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

वनविभागाने तत्काळ पिंजरे लावून बिबट्या पकडण्याची मागणी होत आहे. तसेच काटेरी झुडपे व लपण्याची ठिकाणे तातडीने साफ करावीत, आणि ग्रामीण भागातील मुलांना एकटे सोडू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

error: Content is protected !!