Homeताज्या बातम्याठाण्यात शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

ठाण्यात शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

ठाणे , दि १६ ( अजय मगरे )

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने STARS प्रकल्पाअंतर्गत शाळा पूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

हा मेळावा ठा.म.न.पा. शाळा क्र. १३० व १३१, काजूवाडी, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. शाळा पूर्व शिक्षणावर भर देत बालकांच्या समग्र विकासासाठी आवश्यक शिक्षणपद्धती व उपक्रमांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. मुलांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक व शारीरिक विकासासाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरला.

या कार्यक्रमात पालक, शिक्षक, सी.आर.सी. समन्वयक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. STARS प्रकल्पाच्या माध्यमातून बालवर्ग शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा आणि मुलांना शाळेच्या वातावरणाशी परिचित करून देण्याचा प्रयत्न यामध्ये दिसून आला.

या उपक्रमामुळे नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, शिक्षण प्रक्रियेची भीती कमी होऊन शाळेप्रती आकर्षण निर्माण होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. विशेषतः CBSE आधारित पहिलीतील वर्ग व डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण लाभत असल्याचे पालकांनी नमूद केले.

या मेळाव्याचे यशस्वी आयोजन ठाणे मनपा शाळा क्र. १३० व १३१ काजूवाडीच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. मीना बलकवडे व सौ. पुष्पा सिंग तसेच सीआरसी समन्वयक सौ. सुवर्णा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!