Homeताज्या बातम्याडिजिटल सेवेत आघाडीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण; प्लॅटिनम पुरस्काराने गौरव...

डिजिटल सेवेत आघाडीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण; प्लॅटिनम पुरस्काराने गौरव…

मुंबई, दि.२५ : अजय मगरे

देशातील विविध खाजगी, सार्वजनिक तसेच शासकीय संस्था यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांचा गौरव करणाऱ्या स्कॉच समूहाच्या १०३ व्या परिषदेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा मानाचा ठसा उमटवला आहे.

नवी दिल्लीतील सिल्व्हर ओक, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे २० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या परिषदेत बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास (एसआरए) “नागरी केंद्रित डिजिटल सेवा” या उपक्रमासाठी सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातून यावेळी अन्य काही संस्थांनीही यश मिळवले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाला गोल्ड पुरस्कार तर जिल्हा परिषद अमरावती, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक, जिल्हा प्रशासन हिंगोली, महाराष्ट्र मोटार वाहन विभाग यांना सिल्व्हर पुरस्कार प्राप्त झाले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईला यापूर्वीही “भाडे व्यवस्थापन प्रणाली” या उपक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर गोल्ड पुरस्कार मिळाला होता. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा नागरिकांना डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.

पुरस्कार बृहन्मुंबईतील झोपडपट्टीवासियांच्या विश्वास, सहभाग आणि सहकार्याला समर्पित असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले. पुढील काळातही लोकाभिमुख व डिजिटल सक्षम सेवा पुरविण्यासाठी प्राधिकरण कटिबद्ध राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!