Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर व आंबडवे गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर व आंबडवे गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश….

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश….

मुंबई, दि.१२ : अजय मगरे

रत्नागिरी जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर आणि आंबडवे परिसराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन टप्प्यात (पहिला व दुसरा) सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे स्पष्ट निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आयुक्त दीपा मुधोळकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह उपस्थित होते.
मंत्री शिरसाट म्हणाले की, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या या ठिकाणाचा विकास तातडीने करण्याची आवश्यकता आहे. स्मारक बांधणीसह परिसर विकासासाठी ‘बार्टी’च्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमही सुरू करावेत. स्मारकासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे. यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती स्थापन करून सर्व कामांचा आढावा त्या समितीपुढे सादर करावा.

याशिवाय स्मारक उभारणीसाठी निधीची तरतूद, वास्तुविशारद नेमणूक, प्रकल्पाच्या टप्प्यांची आखणी आणि मौजे आंबडवेतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्व कामांसाठी दोन टप्प्यात सविस्तर प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!