Homeताज्या बातम्यादुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे — मुख्य सचिव सुजाता सौनिक...

दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे — मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे निर्देश

मुंबई, दि.१६ (प्रतिनिधी)

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या दुर्घटनांमध्ये नागरिकांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अशा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.

मुंबईतील अलीकडील लोकलमधून पडून झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी रेल्वे, मेट्रो, पोलीस, महापालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना आणि संभाव्य धोके यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्य सचिव म्हणाल्या, “पावसाळा व सणासुदीच्या काळात सर्व यंत्रणांनी विशेष दक्षता बाळगावी. रेल्वे प्रशासनाने नोडल ऑफिसरची नेमणूक करून गरज असल्यास निवृत्त व तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करून त्याचा प्रसार सोशल मीडिया, एफएम रेडिओ, अनाउन्समेंट सिस्टीम, डिस्प्ले बोर्ड यांच्या माध्यमातून करण्यात यावा. लोकलच्या दरवाजांना स्वयंचलित बंद होणारी यंत्रणा बसवावी व गर्दी वाढल्यास लिफ्टप्रमाणे सायरन वाजवण्याची व्यवस्था करावी.”

त्या पुढे म्हणाल्या की, दुर्घटनेनंतर चुकीची माहिती पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांना योग्य माहिती वेळेवर मिळावी यासाठी तातडीची कृती अपेक्षित आहे. रेल्वे स्थानकांवर बॅगेज स्कॅनर बसवणे, अनोळखी बॅगांची व कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावणे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुरक्षा अधिक बळकट करणे आवश्यक आहे.

या बैठकीला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण, महामुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर तसेच रेल्वे, महसूल, गृह, परिवहन, नगरविकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ब्रिजेश सिंह यांनी नागरिकांना आवश्यक ती माहिती योग्यवेळी आणि एकसारख्या माध्यमातून मिळावी यावर भर दिला. त्यांनी नागरिकांनी अधिक दक्ष राहावे, यासाठी संवेदनशील भागांमध्ये लक्ष केंद्रीत करून माहितीचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!