Homeताज्या बातम्यानागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार ७८८ कोटींची तरतूद.

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार ७८८ कोटींची तरतूद.

१२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किमी लांबीचा ऐतिहासिक द्रुतगती मार्ग; धार्मिक पर्यटनास मोठा चालना….

मुंबई, दि.२४ ( प्रतिनिधी )

राज्याच्या विकासदृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. नागपूरपासून गोवा सीमेसह सिंधुदुर्गातील पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या या महामार्गासाठी २० हजार ७८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणारा आणि पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे समाप्त होणारा हा महामार्ग ८०२.५९२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांना जोडणारा ठरणार आहे.

या मार्गाचा पुढील टप्पा कोकण द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार असून, यामुळे नागपूर ते गोवा हे सुमारे १८ तासांचे अंतर केवळ ८ तासांत पार करता येणार आहे. यामुळे वाहतूक सुलभ होणार असून, वेळ आणि इंधन वाचणार आहे.

हा महामार्ग माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, कारंजा-लाड, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर यांसारख्या महत्त्वाच्या शक्तीपीठांना आणि तीर्थक्षेत्रांना एकत्र जोडणारा असणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठा चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी हुडकोकडून १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यातून ७,५०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) केली जाणार आहे.

हा महामार्ग केवळ वाहतूक सुलभ करण्यासाठी नाही, तर धार्मिक, पर्यटन, आर्थिक आणि ग्रामीण विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्रातील विविध शक्तीपीठांना एकत्र जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!