Homeताज्या बातम्याभ्रष्टाचाराच्या छायेखाली ठाणे महापालिका; 

भ्रष्टाचाराच्या छायेखाली ठाणे महापालिका; 

अपात्र अधिकाऱ्याला थेट उपायुक्तपदी – काँग्रेसची टीका

ठाणे, दि. ३ : अजय मगरे

ठाणे महापालिकेत भ्रष्टाचाराच्या छायेखाली थेट अपात्र अधिकाऱ्याला उपायुक्तपदी बसवण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाणे शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे.

शंकर पाटोळे यांची सहाय्यक आयुक्त पदालाच शासनाची आजवर मान्यता नसताना, त्यांची थेट उपायुक्त पदावर नियुक्ती ही महापालिकेच्या कारभारातील धक्कादायक बेकायदेशीरता असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.

गंभीर आरोपांची मालिका

काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पाटोळे यांच्या कार्यकाळात बीएसयुपी अनियमितता, अँटी करप्शन ब्युरोतील तक्रारी, अनधिकृत बांधकामांना दिलेले संरक्षण, तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारी प्रलंबित आहेत. “अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या पदोन्नतीस मान्यता नसताना त्यांना उपायुक्तपदी नेमणे म्हणजे ठाणेकरांच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे,” असा थेट आरोप पिंगळे यांनी केला.

राजकीय आशीर्वादाचा आरोप

“आम्ही अनेकदा पुराव्यानिशी आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनीसुद्धा या अधिकाऱ्याच्या भ्रष्ट कारकीर्दीबाबत शासनाला पत्र दिले होते. तरीदेखील या अधिकाऱ्याला राजकीय आशीर्वादाने अभय देण्यात आले. ठाणेकरांची ही थेट फसवणूक आहे,” असे काँग्रेसने स्पष्ट केले.

राहुल पिंगळे यांनी पुढे सांगितले की, “आम्ही लवकरच महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम, स्थावर मालमत्ता, घनकचरा आणि शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आणणार आहोत. आयुक्तांनी राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई केली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून ठाणेकरांसाठी लढेल.”

दरम्यान, न्यायालयीन चौकशीची चर्चा सुरू होताच, शंकर पाटोळे यांच्या नियुक्तीवरून ठाण्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ठाणेकर नागरिकांचा सवाल आता एकच

“भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या सूत्रधारांवरही कारवाई होणार का?”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!