Homeताज्या बातम्यामहारेराचा बाधित घर खरेदीदारांना दिलासा... नऊ महिन्यात ५२६७ तक्रारी निकाली...

महारेराचा बाधित घर खरेदीदारांना दिलासा… नऊ महिन्यात ५२६७ तक्रारी निकाली…

मुंबई, दि. ८ : मंगेश म्हात्रे

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने (महारेरा) ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत तब्बल ५२६७ तक्रारींचा निपटारा करून हजारो घर खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. एवढेच नव्हे, तर जुलै अखेरपर्यंत दाखल झालेल्या सर्व तक्रारींना पहिल्या सुनावण्या झाल्या असून काहींच्या सुनावणीच्या तारखा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत.

घरखरेदीदार आपली आजीविकेची कमाई घर खरेदीसाठी गुंतवतात. मात्र, वेळेत ताबा न मिळणे, निकृष्ट दर्जा, करारातील सुविधा न मिळणे अशा विविध समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्यांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण करणे ही महारेराची जबाबदारी आहे. अध्यक्ष मनोज सैनिक, सदस्य महेश पाठक, रविंद्र देशपांडे यांच्या पुढाकारामुळे सुनावण्यांची गती वाढली असून प्रलंबित प्रकरणे झपाट्याने निकाली निघू लागली आहेत.

मे २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून महारेराकडे एकूण ३०,८३३ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी २३,७२६ तक्रारींना निकाल लागले आहेत. यात स्थापनेपूर्वीच्या प्रकल्पांवरील तक्रारींचे प्रमाण ७९% तर स्थापनेनंतरच्या प्रकल्पांवरील तक्रारी २१% एवढे आहे. सध्या राज्यात ५१,४८१ प्रकल्प नोंदणीकृत असून यापैकी ५,७९२ प्रकल्पांवर तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

भविष्यात तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महारेराने प्रकल्प नोंदणी प्रक्रियेत कठोर छाननी यंत्रणा निर्माण केली आहे. प्रकल्पाची कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक वैधता तपासण्यासाठी तीन स्वतंत्र गट नेमले असून आवश्यक तरतुदींची पूर्तता झाल्याशिवाय नोंदणी क्रमांक दिला जात नाही. त्यामुळे ग्राहकांची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि आश्वासित वेळेत प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!