Homeताज्या बातम्याविचारसौदर्य हेच बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे प्राणतत्त्व – श्रीकांत जाधव

विचारसौदर्य हेच बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे प्राणतत्त्व – श्रीकांत जाधव

मुंबई, दि. २८ : अजय मगरे

मूलभूत, मर्मभेदी, चिंतनशील, चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी, झुंझार आणि क्रांतिकारी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती. अस्पृश्य समाजाला नवा उच्चार आणि नवा उद्गार देण्याचे कार्य बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी केले. विचारसौदर्य हेच त्यांच्या पत्रकारितेचे प्राणतत्त्व होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि लेखक श्रीकांत जाधव यांनी केले.

‘डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत पत्रकारिता विषयावर ते बोरिवली (पूर्व) येथील हनुमान टेकडीवरील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४४८, महिला मंडळ आणि प्रबुद्ध सेवा संघ आयोजित वर्षावास मालिकेतील बाराव्या पुष्पप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सचित कांबळे होते. यावेळी नितीन शिर्के, नाता जाधव, प्रशांत जाधव, विजया जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

जाधव पुढे म्हणाले, भावी उन्नतीच्या दिशेची खरीखुरी चर्चा घडवून आणण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांमधून बाबासाहेबांनी मूक समाजाला बोलते केले. मूकनायक ते प्रबुद्ध भारत हा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास म्हणजे त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचा आरसा आहे. आजही या वृत्तपत्रांना प्रचंड महत्त्व आहे.

समाजस्थिती बदलण्याची प्रतिज्ञा या वृत्तपत्रांनी जणू अंगीकारली होती. अलंकारिक भाषेचा आधार न घेता विचारप्रधान शैलीतून बाबासाहेबांनी केलेले लेखन हे त्यांच्या ध्येयवादाचे द्योतक आहे. त्यांच्या प्रत्येक लेखातून कृतीशीलता आणि परिवर्तनाची जाणीव स्पष्ट होते, असेही जाधव म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रिशरण, पंचशील व बुद्धधम्म ग्रंथाचे सामूहिक पठण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!